Thu, Jun 27, 2019 00:03होमपेज › Pune › महिला कर्मचार्‍यांचे पालिकेत शोषण?

महिला कर्मचार्‍यांचे पालिकेत शोषण?

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:10AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका विभागात विभागप्रमुखाचा स्वीय सहायक कार्यालयातील सहकारी महिला कर्मचार्‍यांचे वेगवेगळ्या तर्‍हेने लैंगिक शोषण करीत असल्याची तक्रार पालिका प्रशासनाला नुकतीच प्राप्त झाली आहे.   सदर तक्रारीचे पत्र निनावी असल्याने त्यासंदर्भात काय कारवाई करायची त्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर अंवलबून आहे. पालिका व क्षेत्रीय कार्यालयात काम करणार्‍या महिला अधिकारी व कर्मचार्‍यांना विविध प्रकारे लैंगिक शोषणाच्या तक्रारी आता नियमित झाल्या आहेत. 

एका महिला अभियंत्याचा विनयभंग केल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता दोषी ठरल्याची ताजी घटना आहे. दक्षता समितीच्या शिफारशीनुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याची दोन वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली होती. 

आता नव्याने महिला शोषणाचा प्रकार समोर आला आहे. पालिकेतील एका विभागातील महिला कर्मचार्‍यांना विविध प्रकारे लैंगिक शोषण केले जात आहे. तशी निनावी तक्रारीचे पत्र पालिका प्रशासन विभागाला दहा दिवसांपूर्वी प्राप्त झाले आहे. संबंधित विभागाच्या प्रशासन अधिकार्‍याने ती तक्रार प्रशासन विभागाकडे सादर केली आहे. त्याच्यावर योग्य निर्णय घेण्यासंदर्भात सदर तक्रारीचा अहवाल आयुक्त हर्डीकर यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे.

तक्रार निनावी असल्याने त्यावर आयुक्त हर्डीकर  काय निर्णय घेतात, त्याकडे पालिका वर्तुळात लक्ष लागले आहे. या संदर्भात सहायक आयुक्त डोईफोडे यांनी सांगितले की, तक्रार निनावी पत्राद्वारे करण्यात आली आहे. तक्रारीची खात्री करून पुढील कार्यवाही होऊ शकते. त्यात काही तथ्य न आढळ्यास तक्रार दप्तरी दाखल केली जाईल.