Fri, Jan 18, 2019 09:09होमपेज › Pune › पुणे : माणच्या माजी सरपंचाकडून महिलेची छेडछाड 

पुणे : माणच्या माजी सरपंचाकडून महिलेची छेडछाड 

Published On: May 02 2018 9:17PM | Last Updated: May 02 2018 9:17PMपिंपरी : प्रतिनिधी 

फटाक्याची ठिणगी उडून मंडप जळाल्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेचा हात धरून, शिवीगाळ करत माण गावच्या सरपंचाने मारहाण केली. याप्रकरणी माजी सरपंच आणि त्याच्या भावाविरूध्द हिंजवडी पोलिस ठाण्यात विनयभंग, मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फटाक्याची ठिणगी उडून मंडप जळाल्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेचा हात धरुन, शिवीगाळ करत  माजी सरपंच आणि त्याच्या भावाने सदर महिलेस मारहाण केली. याप्रकरणी 45 वर्षीय या महिलेने याप्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुनिल नामदेव भरणे आणि त्यांचा भाऊ  दिलीप नामदेव भरणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.