Sat, Apr 20, 2019 17:50होमपेज › Pune › ‘राज्यातील प्रत्येक पोलिसाला मिळणार 600 फुटांचे घर’

‘राज्यातील प्रत्येक पोलिसाला मिळणार 600 फुटांचे घर’

Published On: Dec 02 2017 9:31AM | Last Updated: Dec 02 2017 9:31AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यातील प्रत्येक पोलिसाला 600 फुटांचे घरे देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘गौरव पोलिसांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात पार पडलेल्या समारंभात रश्मी शुक्‍ला, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले (सेवानिवृत्त), स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील, दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) राम जाधव, महिला पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, पोलिस हवालदार शैलेश जगताप यांना पोलिस दलातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले.