Fri, Mar 22, 2019 22:49होमपेज › Pune › एव्हरेस्टवीर आनंदची आता उत्तर ध्रुवावर चढाई

एव्हरेस्टवीर आनंदची आता उत्तर ध्रुवावर चढाई

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 04 2017 11:11PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

उत्तर ध्रुव, पृथ्वीचे सर्वात वरचे टोक. म्हणजेच आर्क्टिक महासागर. रक्त गोठवणारी थंडी, हजारो किलोमीटर विस्तीर्ण बर्फ, बर्फाचे गोठणे आणि वितळणे सारखे सुरू असणार्‍या आर्क्टिक महासागरावर भारतीय एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आता चढाई करणार आहे. 

‘पोलर एक्सपिडिशन’ (उत्तर ध्रुव) मध्ये आनंदला नामांकन मिळाले आहे. ऑनलाईन मतांद्वारे जगातील 20 व्यक्तींची स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. जागतिक ऑनलाइन वोटिंगमध्ये सध्या तो पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान, मंगोलिया, ग्रीस येथील युवक आनंदच्या पुढे आहेत. 

निरंतर प्रयत्न केल्यास अपयशालाही हार मानावी लागते. आपल्याला काय करायचे, आपले ध्येय कोणते याकडे लक्ष द्यायचे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे. आनंद बनसोडे  हा एक हरहुन्नरी गिर्यारोहक आहे. आनंदने घेतलेला हा एक धाडसी व कौतुकास्पद निर्णय असून भारताच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा रोवणारा आहे. आनंद बनसोडे याने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर असे विविध रेकॉर्ड्स केले आहेत. तसेच विविध 41 पुरस्कारांनी बनसोडेना  सन्मानित करण्यात आलेले आहे.

आनंदाला पाचव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहचविण्यासाठी अवघ्या 600  ऑनलाइन मतांची गरज आहे. आनंदचा विजय हा प्रत्येक भारतीयाचा विजय असल्याने त्याला ऑनलाइन मताचे पाठबळ देण्याचे आवाहन त्याने केले आहे.