Thu, Jun 27, 2019 11:54होमपेज › Pune › निधी कमी मिळाला तरी ‘मेट्रो’चे काम वेगातच

निधी कमी मिळाला तरी ‘मेट्रो’चे काम वेगातच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सन 20018-2019 आर्थिक वर्षासाठी तब्बल 1 हजार 600 कोटी रुपये निधीची मागणी राज्य व केंद्राकडे केली होती. त्यातील 850 पैकी केवळ 310 कोटी निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. टप्पाटप्याने हा निधी मिळेल, त्यामुळे कामांचा वेग कायम राहणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. 

दीक्षित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी नागपूर मेट्रोचे समन्वयक अंकलेश साळवे, अरुण सक्सेना आणि अधिकारी उपस्थित होते. डॉ. दीक्षित म्हणाले की, हिवाळी, पावसाळी व आर्थिक अधिवेशन काळात उर्वरित निधी उपलब्ध होईल. निधीचा कामावर परिणाम होणार नसून, काम सध्याप्रमाणे वेगात सुरू राहील. 

अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी याचा विचार करता नागपूर मेट्रोप्रमाणे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात जागेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी ‘डबलडेकर मेट्रो’ मार्ग योग्य पर्याय नाही का, या संदर्भात विचारले असते ते म्हणाले की, पुण्यात कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकात डबर डेकरचा केवळ 600 मीटरचा मार्ग करण्याचा प्रस्ताव पुणे पालिकेने दिला होता. त्यानुसार काम करण्यात येणार आहे. डबरडेकर मार्गाचा प्रस्ताव संबंधित पालिकेने दिल्यास विचार होऊ शकतो. पुणे-मुंबई जुन्या महागार्मावर ग्रेडसेपरेटर असल्याने तेथे ही संकल्पना राबविता येणार नाही. नागपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरणाने मेट्रोवर जबाबदारी दिल्याने डबरडेकर मार्ग तयार केला जात आहे.

एकत्रितपणे काम झाल्याने खर्चात जवळजवळ 20 ते 30 टक्के बचत होत आहे. त्याचे अंतर 3.5 व 4.5 असे तब्बल 8 किलोमीटर असून, त्यावर मेट्रो स्थानकेही आहेत. हा देशातील पहिलाच वेगळा मार्ग ठरणार आहे. जबलपूरमध्ये केवळ 1.8 किलोमीटरचा मार्ग आहे. कात्रज व निगडीपर्यंत मेट्रो विस्तारासंदर्भात डीपीआरचे काम सुरू असून, ते 3 महिन्यांत पूर्ण होईल. पालिकेकडून राज्य शासनास सादर झालेल्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर काम सुरू करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संत तुकारामनगर, फुगेवाडी, डेक्कन, बालगंधर्व, रेंजहिल्स येथील मेट्रो स्थानकांचे आराखडे,डिझाईन तयार झाले आहे. नागपूरच्या कामाचा अनुभव पुणे मेट्रोसाठी मिळत आहे. परिणामी, पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. खडकी कॅन्टोन्मेंटकडून खडकी रेल्वे स्थानक ते रेंजहिल्स मार्गाचा ताबा लवकरच मिळेल व तेथे महिनाभरात काम सुरू होईल, असे दीक्षित म्हणाले.


  •