Wed, Jun 26, 2019 23:31होमपेज › Pune › पालिकेत समाविष्ट होऊनही उंड्री गाव उपेक्षितच

पालिकेत समाविष्ट होऊनही उंड्री गाव उपेक्षितच

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 10:58PMकोंढवा : वार्ताहर

पालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी म्हणण्याची वेळ उंड्री परिसरातील लोकांवर आली असून, विविध विकासकामांची तर ओरड आहेच मात्र तहानलेल्या लोकांना प्यायला वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे, लोकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेत समाविष्ठ झाल्यापासून जवळपास सर्वच विकास खुंटला गेला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

उंड्री गावचा सर्वांगीण विकास व्हावा व परिसर सुजलाम सुफलाम दिसावा यासाठी अनेक लोक उंड्री गाव पालिकेत समाविष्ठ होण्याची वाट पाहात होते. शुध्द पाणी मिळणार या आशेने बसलेल्या नागरिकांची पुरतीच निराशा झाली आहे. 2 ते 3 हजार लोकसंख्या असलेले जूने गाव, मात्र अलीकडच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली असून, जवळपास 25 ते 30 हजार लोकसंख्या असलेले उंड्री गाव नव्याने पुणे शहराच्या नकाशावर अग्रेसर आहे. टोलेजंग इमारती या परिसरात उभ्या राहिल्या असून, प्रत्येकाला पाण्याची अत्यंत गरज आहे मात्र पालिका पाणी देण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप येथील रहिवाशी करत आहेत.

जवळपास पाचशे टँकर पेक्षा आधिक खासगी टँकर सोसायट्यांमधले लोक विकत घेत आहेत. पालिकेचे पाणी नळांना कधी तरी येत असून, ते ही दुषीत पाणी येत असल्याचे नागरिकांचे मत आहे. दररोज उंड्री गावाला 7 ते 8 लाख लिटर पाण्याची गरज असताना पालिका 8 ते 10 दिवसानंतर 1 लाख लिटर पाणी देत आहे असे नागरिकांचे मत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही ठिकाणी गावामध्ये वीजे खांब उभे केलेले असता अचानक उंड्री गाव पालिकेत समाविष्ठ झाले. मात्र आज पर्यंत पालिकेने त्या खांबावर दिवे लावण्याची तसदी घेतली नाही. एक ना अनेक अडचणीच्या विळाख्यात उंड्रीचा ग्रामस्थ अडकला असून, त्यांच्या विकासाची मुहूर्तमेढ नक्की कधी उभी राहणार याची चिंता नागरिकांना भेडसावत आहे.

वाढत्या उन्हाळ्यामुळे लोकांना पाणी मोठ्या प्रमाणात लागत असून, खासगी पाण्याच्या टँकरचे भाव गगनाला भिडले गेले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक पुरताच अडचणीत आला आहे. गाव ग्रामपंचायतीमध्ये असताना पंचायतीच्या माध्यमातून थोड्या फार प्रमाणात टँकरव्दारे सोसायट्यांना पाणी पुरविले जात होते. मात्र पालिकेत समाविष्ठ होवून देखिल पाणी पाणीस् करण्याची वेळ उंड्री गावावर आली आहे. ज्यां गावाना पुरेस आहे त्यांना परत परत देण्याचे काम पालिका करत आहे. मात्र जे वंचित आहेत त्यांना मात्र पालिकेकडून काहीही मिळत नाही अशी खंत येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

 

Tags : pune, undri news, corporation included, neglected,