Fri, Apr 26, 2019 09:22



होमपेज › Pune › इथेनॉल’मधून कारखान्यांना मिळणार 1771 कोटी रुपये

इथेनॉल’मधून कारखान्यांना मिळणार 1771 कोटी रुपये

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 1:27AM



पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्रातून 43 कोटी 37 लाख लिटरइतक्या इथेनॉल खरेदीतून पुरवठादार कारखान्यांना 1 हजार 771 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. इथेनॉलचा दर लिटरला 40 रुपये 85 पैसे असून 66 उत्पादकांनी निविदा भरल्यानंतर मागील 3 महिन्यात 11 कोटी 50 लिटर खरेदी होती. प्रत्यक्षात 26 फेब्रुवारीअखेर फक्त 5 कोटी 46 लाख लिटरइतकीच इथेनॉलची उचल केल्याने खरेदीबाबत कंपन्या उदासीन असल्याचा आरोप राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी केला.

देश पातळीवर ऑईल कंपन्यांकडून ऊस गाळप हंगाम 2017-18 मध्ये इथेनॉल खरेदीच्या 313 कोटी 57 लाख लिटरच्या निविदा 17 ऑक्टोंबर रोजी काढण्यात आल्या. 1 डिसेंबर 2017 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीकरीता निविदा प्रसिद्ध झाल्या. मात्र, निविदा अंतिम होण्यास व इथेनॉल उत्पादकांना पर्चेस ऑर्डर व पुरवठा करण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क खात्याची परवानगी घेण्यास जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागल्याचे सांगून पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्यातील इथेनॉल उत्पादकांनी 43 कोटी 37 लाख लिटर म्हणजे मागणीच्या जवळपास शंभर टक्के इथेनॉल पुरवठा करण्याच्या ऑर्डर्स मिळाल्या. पंरतु ऑईल कंपन्यांनी केवळ 5.46 कोटी लिटर इथेनॉलची उचल केलेली आहे.

डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात 11.50 कोटी लिटर इथेनॉलची उचल झाली असती तर पुरवठादार कारखान्यांना 469 कोटी रुपये मिळाले असते. प्रत्यक्षात 5.46 कोटी लिटर उचलमुळे 223 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 

संपुर्ण कोटा उचलला न गेल्यामुळे उत्पादकांना 246 कोटी रुपये कमी मिळाले आहेत. त्यामुळे कारखान्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासही अडचणी येत आहेत. तसेच कंपन्यांच्या ऑईल डेपोवर 7 ते 8 दिवस इथेनॉलचे टँकर खाली होण्यास विलंब लागत आहे. साखर कारखान्यांना ऊस गाळप हंगामामध्ये जास्तीत जास्त ‘इथेनॉल’चा पुरवठा होण्याची अपेक्षा असते. त्याच कालावधीत ऑईल कंपन्यांकडून अनेक कारणे सांगून इथेनॉल उचलण्यास विलंब केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला असून कंपन्यांनी इथेनॉलची उचल वेळेत करण्याची मागणी केली आहे.