Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Pune › मुलाची हत्‍या करून आयटी इंजिनीयरची पत्‍नीसह आत्‍महत्‍या

मुलाची हत्‍या करून आयटी इंजिनीयरची पत्‍नीसह आत्‍महत्‍या

Published On: Jan 19 2018 9:21AM | Last Updated: Jan 19 2018 11:31AMपुणे : प्रतिनिधी

भोसरीतील कुटुंबाने आत्महत्या केल्याचा घटना समोर असताना बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनीअरने पत्नी व चार वर्षांच्या मुलासोबत जीवन संपवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान त्याने पत्नीचा व मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जयेशकुमार पटेल (वय ३४), पत्नी भूमिका पटेल (वय ३०) आणि नक्ष (४) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर आहेत. महिना दिड लाख पगारावर ते एका नामांकित कंपनीत नोकरीस होते, तर पत्नी गृहिणी होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे घर आतून बंद होते. त्यामुळे शेजार्‍यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षला रात्री ११ वाजता माहिती दिली. चतुःश्रृंगी पोलिसांनी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बाल्कनीतून पोलिसांनी पटेल यांच्या घराजवळ पोहचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी पूर्ण कुटुंब मृत अवस्थेत आढळून आले.  

पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसत आहेत, तर मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आला होता. त्यामुळे एकाच वेळी दोघांनी गळफास घेतला असावा किंवा पतीचा व मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

दरम्यान शहर आत्महत्येच्या घटनांनी हादरून गेले आहे. भोसरीत एकाच कुटुंबात तिघांनी आत्महत्या केली. तर त्याचवेळी हिंजवडीत नर्सने आत्महत्या केली. येरवड्यातही एकाने आत्महत्या केली. आता आयटी इंजिनीअरने पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे.