Sun, Jan 20, 2019 06:40होमपेज › Pune › निगडीत उभारणार १०७ मीटरवर तिरंगा

निगडीत उभारणार १०७ मीटरवर तिरंगा

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 25 2018 10:30PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात शुक्रवारी (दि.26) केले जाणार आहे. वीरचक्र सन्मानित निवृत्त कर्नल सदानंद साळुंके यांच्या उपस्थितीत सकाळी दहाला कार्यक्रम होणार आहे, असे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. 

या वेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर ओ. पी. वैष्णवी, पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त शालेय विद्यार्थी देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. भारताच्या तिरंग्याबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळे आदराचे स्थान आहे. ही भावना नवीन पिढीच्या मनात रुजत राहण्याच्या दृष्टीने; तसेच देशाबद्दल प्रेम व्यक्त करण्याकरिता निगडीत 107 मीटर  उंचीवर दिवस-रात्र तिरंगा शुक्रवारी अभिमानाने फडकणार आहे. तिरंग्याच्या आकार 120 फूट बाय 80 फूट आहे. यापूर्वी 105 मीटर उंचीचा तिरंगा वाघा बॉर्डरजवळील अटारी येथे उभारण्यात आला आहे.