Mon, May 20, 2019 08:55होमपेज › Pune › ‘एम्पायर इस्टेट’ पुलाचे सोमवारी लोकार्पण

‘एम्पायर इस्टेट’ पुलाचे सोमवारी लोकार्पण

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 05 2018 12:40AMपिंपरी : प्रतिनिधी

महापालिकेतर्फे चिंचवड येथे उभारण्यात येत असलेल्या एम्पायर इस्टेट पुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. येत्या सोमवारी (दि.7) हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तसेच या पुलाचे संत मदर तेरेसा असे नामकरण देखील करण्यात येणार आहे. यासोबत कासारवाडी येथील रॅम्प आणि पिंपळेगुरव येथील वाय जंक्शनचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) अकरा किलोमीटर लांबीच्या काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी (219.20) या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1600 मीटर लांबीच्या चिंचवड-एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुल उभारण्याचा निर्णय घेतला. या पुलाला 2010 मध्ये मान्यता मिळाली. त्यासाठी सन 2011 मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्यक्षात 6 एप्रिल 2011 ला पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. तब्बल आठ वर्षांनी आता पुलाचे काम पुर्ण झाले आहे. 

येत्या सोमवारी हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तसेच या पुलाचे संत मदर तेरेसा असे नामकरण देखील करण्यात येणार आहे. हा पुल नवीन आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहने सावकाश चालवावित असे आवाहन, पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. यासोबतच कासारवाडी येथील रॅम्प आणि पिंपळेगुरव येथील वाय जंक्शनचे देखील पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पक्षनेते एकनाथ पवार व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काल गुरुवारी एम्पायर इस्टेट पुलाची पाहणी केली. पवार यांनी आज कासारवाडी नाशिक फाटा पुलाचा शंकर मंदिराजवळ उतरणारा रॅम्प, पिंपळे निलख येथील वाय जंक्शनची पाहणी केली. या वेळी सह शहर अभियंता राजन पाटील हेही उपस्थित होते.