Sat, Apr 20, 2019 07:52होमपेज › Pune › भावनिकता अन् आमिष हेच सायबर भामट्यांचे अस्त्र...

भावनिकता अन् आमिष हेच सायबर भामट्यांचे अस्त्र...

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 12:33AMपुणे : अक्षय फाटक

कधी फेसबुकवरून मैत्रीसाठी रिक्वेस्ट..कधी प्रेमाच्या आणाभाका व गिफ्टचे अमिष...कधी मोठी लॉटरी लागल्याचा ई-मेल. तर, कधी जॉब आणि कर्ज मिळवून देण्याचे बहाणे...तर, अचानकच तुमच्या खात्यावरून ऑनलाईन खरेदी आणि थेट पैसे काढल्याचाच एसएमएस...मोठ्या परताव्यासह इन्शुरन्स देण्यासाठी लावला जाणारा तगादा यासह असंख्य अशा असंख्य बहाण्याने सध्या सायबर भामटे पुणेकरांच्या कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारत आहेत.यात सगळ्यात धक्कादायक म्हणजे, पुणेकरांना या सायबर भामट्यांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल 7 कोटींहून अधिक रुपयांना लुबाडले आहे. त्यातही उच्च शिक्षीत पुणेकरांचीच संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पुणेकर कुठेच मागे नाहीत. तर, पुणेकरांचा ऑनलाईन व कॅशलेस व्यवहारांना उंदड प्रतिसाद असतो. सोशल मिडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, आता या टेक्नोसॉव्हीचे फायद्याबरोबरच तोटेही दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षार्ंमध्ये  सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातही विशेष म्हणजे, उच्च शिक्षीतांचीच अशा प्रकराने जास्त फसवणूक होत आहे. काही अमिषाला बळी पडून तर काही बेफिकीरीमुळे ही या भामट्यांचे लक्ष्य बनत आहेत. 

टेक्नोसॉव्ही असलेल्या उच्च शिक्षीतांना ऑनलाईन फसवणूकीच्या बाबतीत घ्यावयाच्या खबरदारी माहिती असतानाही अनेकजन त्यास बळी पडत आहेत. बँकाकडून वेळोवेळी सावध केले जात असताना आणि पोलिसांकडून जनजागृती केली जात असतानाही अनेकजण याला बळी पडत असल्याचे दिसते. यंदा फसवणूकीचा आकडा हा बिटकॉईनमुळे वाढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. जानेवारी ते मे या केवळ पाच महिन्यांत पोलिसांकडे 2 हजार 321 तक्ररी आल्या आहेत. पुण्यासह देशभर गंडा घालणारे हे सायबर गुन्हेगार दिल्ली व झारखंडमधील असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाई दिसत आहे. बहुंताश उच्चशिक्षीत असून त्यांनी कॉल सेंटरच सुरु केले आहेत. त्याठिकाणी नागरिकांची माहिती काढण्यास मुलांनाच नोकरीस ठेवले गेल्याचेही समोर आले आहे.

ज्येष्ठ नागरिक व महिलांना लक्ष

ज्येष्ठ महिला, नागरिक तसेच मेट्रोमोनियावर नोेंदणी असणार्या महिलांना हे सायबर भामटे लक्ष करतात. त्यांच्याशी फेसबुकवरून ज्येष्ष्ठांना संपर्ककरून त्यांचा विश्‍वास संपाद केला जातो. काही दिवसांनी परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे सांगून पैसे उकळले जातात. काही घटनांमध्ये ज्येष्ठांना मैत्री व लग्नाचे अमिष दाखवले जाते. त्यांची वैयक्तिक व बँकेची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केले जातात. तर, बड्या पदावर नोकरी करणार्या तसेच विविह संकेत स्थळावर नोंदणी केलेल्या महिलांना संपर्क केला जातो. त्यांना लग्नाचे बहाण्याने फसवले जात आहे.

पुणेकरांचे 3 कोटी 67 लाख वाचवले

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गेल्या पाच महिन्यात पुणेकरांचे 3 कोटी 67 लाख 25 हजार रुपये वाचविले आहेत. ऑनलाईन किंवा खात्यावर पैसे भरले आणि तुम्हाला तत्काळ फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तर, वेळीच पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिल्यास हे पैसे परत मिळू शकतात. पोलिसांनी पाच महिन्यात पुणेकरांचे असे पैसे वाचवले आहेत. पोलिसांकडून सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने त्याबाबत शाळा, महाविद्यालये, कंपन्यांमध्ये जनजागृतीही केली जात आहे.