Wed, Apr 24, 2019 07:33होमपेज › Pune › इलॅवेनिल वॅलरिवन हिला सुवर्णपदक

इलॅवेनिल वॅलरिवन हिला सुवर्णपदक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील ‘गन फॉर ग्लोरी शूटिंग अकॅडमी’ची नेमबाज इलॅवेनिल वॅलरिवन हिने सिडनी येथे झालेल्या ‘आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड कप’मध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. इलॅवेनिलने या स्पर्धेत 249.9 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पात्रता फेरीतही तिने 631.4 गुण मिळवत ज्युनिअर गटात जागतिक विक्रम नोंदवला. 

इलॅवेनिल ही मूळची गुजरात येथील असून ती पुण्यात ’गन फॉर ग्लोरी’च्या ’प्रोजेक्ट लीप’ या उपक्रमाअंतर्गत नेमबाजीचे प्रशिक्षण घेते. तिने आपल्या संघातील नेमबाज श्रेया अगरवाल आणि झीना खिट्टा यांच्यासमवेत एकूण 1876.9 गुणांची घसघशीत कमाई करत सांघिक सुवर्णपदकही पटकावले आणि नेमबाजीच्या ज्युनिअर विभागात आणखी एक जागतिक विक्रम नोंदवला. श्रेया अगरवाल हीदेखील ’गन फॉर ग्लोरी’च्या जबलपूर शाखेत प्रशिक्षण घेते. इलॅवेनिलने ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये प्रदर्शन करण्यापूर्वी ’वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स- 2018’मध्ये 400 गुणांची कमाई करत वैयक्तिक काँस्य पदक आणि सांघिक रौप्य पदक पटकावले होते.

गेल्या काही महिन्यांपासून नेमबाजीचा केलेला सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे यश अपेक्षित होते, अशी भावना इलॅवेनिल हिने व्यक्त केली. इलॅवेनिलमध्ये जागतिक स्तरावरील विक्रम प्रस्थापित करण्याची क्षमता आधीपासूनच असल्याचा विश्‍वास गगन नारंग यांनी व्यक्‍त केला.

 

Tags : pune, pune news, ISSF Junior World Cup, Elevenval Valerian, Gold Medal,


  •