Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Pune › अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका १५ एप्रिलपर्यंत मिळणार

अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका १५ एप्रिलपर्यंत मिळणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या माहिती पुस्तिकेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना मिळणार असून या माहिती पुस्तिकेत काही महत्त्वाचे बदल केले जाणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहायक संचालक मिनाक्षी राऊत यांनी दिली आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा संपताच विद्यार्थी आणि पालकांना वेध लागतात ते अकरावी प्रवेशाचे. पुण्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. परंतु यासाठी अर्ज कसा भरायचा, प्रवेशासाठी कोणकोणती महाविद्यालये उपलब्ध आहेत. कोणत्या महाविद्यालयाचे मेरीट गेल्या वर्षी किती होते, अशा प्रकारची अकरावी प्रवेशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी सर्व माहिती अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेत उपलब्ध करून देण्यात येते.

यंदा ही पुस्तिका विद्यार्थ्यांना साधारण 15 एप्रील या दिवशी मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या पुस्तिकेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून त्यातील प्रमुख बदल म्हणजे शाळांची मेरीटची यादी पुस्तिकेत उपलब्ध केली जाणार नाही. ही यादी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर पहायला मिळणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. तसेच अकरावी प्रवेशाच्या दृष्टीने विविध महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली असून प्रवेशाच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देण्यात आल्या असल्याचे देखील राऊत यांनी सांगितले आहे.


  •