Wed, Jul 17, 2019 18:55होमपेज › Pune › वीजवाहिन्यांच्या देखभालीसाठी अर्ध्या शहरातील वीज बंद

वीजवाहिन्यांच्या देखभालीसाठी अर्ध्या शहरातील वीज बंद

Published On: May 11 2018 1:34AM | Last Updated: May 11 2018 1:30AMपुणे : प्रतिनिधी 

महावितरणच्या पुणे परिमंडलात गुरुवारी वीजवाहिन्या तसेच रोहित्रांच्या पावसाळापूर्व देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येत असल्यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा दिवसभर बंद होता. वीजबंद आणि प्रचंड उकाड्यामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल झाले.अगोदरच मागील काही दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानात प्रचंड वाढ चालली आहे.गुरुवारी शहराच्या तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे होता. त्यातच सकाळपासून वीज बंद असल्यामुळे उकाड्याने पुणेकर चांगलेच हैराण झाले.

पुणे परीमंडलातील वाडिया उपविभाग, पर्वती विभाग, पद्मावती विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत शहराचा सुमारे निम्मा भाग येत आहे. या भागातील वीजवाहिन्यांना धोकादायक ठरणार्‍या झाडांच्या फांद्या, भूमिगत वाहिन्या, रोहित्रांमध्ये ऑईल भरणे, फ्युज बदलणे, फिडर पिलरची दुरूस्ती, खांबावरील वीजवाहिन्यांसह इतर देखभाल दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सायकांळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

वीज पुरवठा दिवसभर बंद ठेवण्यात आल्यामुळे पुणेकर उकाड्यामुळे चांगलेच हैराण झाले होते. दुपारच्या कडक उन्हात थंड पेय पिऊन थंडावा निर्माण करण्याचा प्रयत्न काही नागरिक करीत होते.
झाडांच्या सावलीचा आधार काही नागरिकांनी घेतले असल्याचे दिसून आले. मात्र तरी देखील उकाडा कमी होत नव्हता. अखेर सांयकाळच्या वेळी वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.

नागरिकांची पाण्यासाठीही भटकंती

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथील विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठेवण्यात आला होत. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. हे चित्र शहरातील विविध झोपडपट्ट्यांच्या परिसरात आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळाले. उपनगरांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी नेतेमंडळींनी पाण्याच्या टँकरची व्यवस्ता केल्याने काही नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. दरम्यान आज (शुक्रवारी) सकाळी उ़शीरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.