Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणूकीत गोंधळ

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणूकीत गोंधळ

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 12:51PMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेच्या निवडणूकीत अधिसभा सभागृहाबाहेर निवडणूकीची व्यवस्था केल्याने सुरूवातीलाच सभागृहात गोधंळ झाला.

उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांनी यावर आक्षेप घेत मतदान सभागृहात घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे दुपारी साडे बारा वाजताची मतदानाची वेळ उलटूनही मतदान झाले नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला अधिसभेच्या बैठकीत सुरूवातीलाच नामुश्कीचा सामोरे जावे लागले.