Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Pune › निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा आत्मा 

निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा आत्मा 

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:32AMपुणे : प्रतिनिधी

देशातील निवडणूक प्रक्रिया लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे लोकशाहीच्या देवावर देशाचा कारभार चालविला जात आहे. लिखित घटनेमुळे सर्वसामान्य माणूस ते उद्योगपतींपर्यंत सर्वांना एकाच मताचा अधिकार देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिप्रेत असणार्‍या सामान्य माणसांचा विचार महत्त्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता देण्याचा अधिकार घटनादुरुस्तीमुळे मिळाला आहे. म्हणूनच लोकशाहीचा आत्मा बळकट झाल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी सुरक्षामंत्री गिरीश बापट यांनी केले आहे. 

74 वी घटना दुरुस्ती रौप्यमहोत्सवी वषर्र् कार्यक्रमाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते ‘यशदा’मध्ये करण्यात आले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, राज्य निवडणूक उपायुक्त अविनाश सणस उपस्थित होते. देशाच्या विकास यंत्रणेत स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी 25 वर्षांपूर्वी 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. रौप्यवर्षानिमित्त राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त कार्यालय आणि महापालिकेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

बापट म्हणाले,  घटनादुरुस्तीमुळे अनेकांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. तसेच जुन्या चाली-रूढी आणि परंपरांमुळे चूल व मूूल अशा संकल्पनेत अडकलेल्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली आहे. महिलांचा सहभाग वाढल्याने त्यांना  निवडणुकीतील आरक्षणामध्ये फायदा होत आहे. ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह शिक्षण, नोकरीमध्ये महिलांना अधिक फायदा होत आहे.  मागील काही वर्षांपूर्वी निवडणूक बूथ बळकावले जायचे. योग्य आणि निरपेक्ष पद्धतीने निवडणुका पार पाडल्या जात नव्हत्या. दरम्यानच्या कालखंडात निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या चांगल्या कारभारामुळे निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होऊन लोकशाहीला बळकटी मिळाल्याची पुष्टी त्यांनी दिली.