Fri, Sep 21, 2018 12:11होमपेज › Pune › बँकेतून आठ लाख लंपास 

बँकेतून आठ लाख लंपास 

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 12:04AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

मार्केटयार्डातील अहमदनगर मर्चंट को. ऑप बँकेच्या शाखेत ग्राहकाच्या लॉकरजवळ पोत्यात ठेवलेली आठ लाखांची रोकड अज्ञाताने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 15 डिसेंबर ते 28 डिसेंबरदरम्यान घडला. याप्रकरणी पोलिस नाईक वैभव मोरे यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर मर्चंट को ऑप  बँकेच्या मार्केटयार्ड शाखेत ग्राहकांच्या लॉकरजवळ आठ लाख रुपयांची रोकड एका पोत्यात घालून ठेवण्यात आली होती. ही रोकड 15 डिसेंबर रोजी येथे ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही रोकड येथून अज्ञाताने लांबविल्याचे 28 डिसेंबर रोजी उघडकीस आले.