Sun, Aug 18, 2019 21:21होमपेज › Pune › चांदणी चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण

चांदणी चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 12:05AMपौडरोड : वार्ताहार 

पुणे शहराच्या दक्षिणद्वार म्हटले जणारे चांदणीचौक येथे नित्याचीच सकाळी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी हिट असल्या मुळे नागरिकांना त्रासाचे सामोरे जावे लागत असल्यामुळे हा चांदणी चौकातील दोन रस्ते व नवीन उड्डाणपूल होणार कधी? आणि वाहतूक सुटणार कधी? असा प्रश नागरिकांना पडला आहे.या चौकातील वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकात उड्डाणपूल महत्वाचा दुवा ठरणार आहे. पण या पुलाचे काम करण्यासाठी भूसंपादन करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असून, गेल्या काही महिने उलटून गेले असले तरी देखील जागा संपादित केलेली नाही. पालिकेच्या ताब्यातली अडीच हेकटर जागा राष्ट्रीय महा मार्ग प्राधिकरणकडे (एन.एच.आय.) हस्तांतरित करण्या साठीदेखील वेळ मिळालेला नाही. प्रशासन सुस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत उड्डाणपुलाचे भूमी पूजन करण्यात आले होते.  मात्र आता जवळ पास 9 महिने उलटूनही उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकले नाही. या कामासाठी आवश्यक असलेली भूसंपादन करण्याची जवाबदारी महापालिकेवर आहे. मात्र गेल्या 9 महिन्यात प्रशासनाला भूसंपादन करता आले नाही.महापालिकाचे आयुक्त यांचा कडून डिसेंबर 17 पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्यावर काहीही कार्यवाही झालेली नसल्याचे चित्र सामोरे आले आहे. काही महिन्यांपूर्वी एनएचआय कडून पालिकेला पत्रव्यवहाराने भूसंपदना च्या दिरंगाईमुळे या प्रकल्पाला उशीर होत असल्याचे सांगण्यात आले होते. प्रशासनाने चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी रस्तारुंदीचे काम लगेच सुरू केले पाहिजे होते पण ते देखील मंदावले आहेत.यावर तोडगा प्रशासनाने नाही काढला तर मात्र मनसे स्टाईल आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसे कोथरुड विभागाचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी सांगितले.