Sun, Mar 24, 2019 10:51होमपेज › Pune › पालिकेच्या पायर्‍यांवर ईव्हीएम मशिन जाळल्या

पालिकेच्या पायर्‍यांवर ईव्हीएम मशिन जाळल्या

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 31 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार झाल्याच्या तक्रारी आहेत. मशिनमध्ये फेरफार करूनच भाजपने विविध निवडणुका जिंकल्या आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनचा वापर टाळून लोकशाही वाचवावी, या मागणीसाठी बुधवारी पुणेकर जागरूक कृती समितीच्या वतीने महापालिका भवनच्या पायर्‍यांवर प्रतीकात्मक ईव्हीएम मशिन जाळून आंदोलन करण्यात आले. 

ईव्हीएमच्या विरोधात अनेक लेखी तक्रार केल्या. या तक्रारी करून दीड वर्ष  झाले तरी उत्तरे दिली नाहीत, निवडणूक अधिकारी सत्ताधारीच्या दबावाखाली काम करतात. पालघर असेल गोंदिया असेल पुन्हा एकदा ईव्हीएम घोळ समोर आला आहे, असा आरोप करतानाच, लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएम मशिन बंद करून पुन्हा मतपत्रिकेचा वापर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन या वेळी पालिका अधिकार्‍यांना देण्यात आले.