Sun, Dec 15, 2019 03:03होमपेज › Pune › राज्य  तंत्रशिक्षण संचालकांचा आदेश

ईबीसीवरून विद्यार्थ्यांची अडवणूक नको

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 1:08AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काच्या 50 टक्के रक्कम ईबीसी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासनाकडून मिळत असताना देखील राज्यातील अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांकडेे शिक्षण शुल्काचा तगादा लावतात. तसेच शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून दिले जात नाही. 

तर विद्यार्थ्यांनाच दमबाजी करून त्यांच्याकडून शुल्कवसुली करण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर तंत्रशिक्षण संचालकांनी महाविद्यालयांनी ईबीसीवरून विद्यार्थ्यांची अडवणूक न करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. आर्थिक मागास विद्यार्थ्यांना अनुज्ञेय असणार्‍या शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी आगाऊ स्वरूपात घेवू नये, असे निर्देश असताना देखील पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्ट्यिुट ऑफ टेक्नोलॉजी या महाविद्यालयाने अर्थिक मागास विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्काचा तगादा लावला होता.

तसेच शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे ओळखपत्र देखील दिले नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. तसेच 2017-18 मध्ये प्रवेशाच्या वेळी जर विद्यार्थ्यांकडून आगाऊ रकमेचे धनादेश घेतले असतील तर हे धनादेश विद्यार्थ्यांना तत्काळ परत करण्याचे आदेश दिले आहेत.