Tue, May 21, 2019 04:06होमपेज › Pune › टपाल विभागात ‘ ई-रजिस्ट्रेशन’

टपाल विभागात ‘ ई-रजिस्ट्रेशन’

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 1:55AM

बुकमार्क करा
पुणे : शिवाजी शिंदे

नागरिकांना विविध कामांसाठी अधिक जवळ असलेल्या टपाल विभागात त्यांच्या सोयीसाठी ‘ई-रजिस्ट्रेशन’ सुविधा लवकरच  सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागात मागील अनेक वषार्र्ंपासून वाढलेला कामांचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे. 

केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या टपाल विभागाने अत्याधुनिकतेचा वसा घेत काळाच्या ओघात अनेक बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार मागील काही वषार्र्ंपासून टपाल विभागात  बदल घडून आले असून, टपालाच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक केंद्र शासनाचे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याताच एक भाग म्हणून आधारकार्ड मध्ये दुरुस्ती करणे, नवीन आधार कार्ड काढणे, पासपोर्ट काढणे याचबरोबर नागरिकांसाठी पोस्ट  बँक हे उपक्रम सुरू केले  आहेत. विशेष म्हणजे  हे सर्व उपक्रम अत्यंत यशस्वीपणे सुरू आहेत. 

आता मात्र टपाल विभागात नागरिकांच्या सोयीसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांसाठीचे ‘ई-रजिस्ट्रेशन’ सुरू होणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेला भाडेकरार आता टपाल कार्यालयात सुरू होणार आहे. त्यासाठी टपाल कार्यालयाच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार ही यंत्रणा लवकरच कार्यालयात बसविण्यात येणार आहे. वास्तविक पाहता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागास जमिनींच्या नोंदींबरोबरच खरेदी-विक्री व्यवहार करणे, दस्त नोंदणी,  विवाह नोंदणी, भाडेकरार करणे, तसेच इतर अनेक कामांची रेलचेल असते. त्यामुळे या विभागाच्या दस्त नोंदणी कार्यालयात कायमच नागरिकांची गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी भाडेकरारचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया टपाल कार्यालयात सुरू होणार आहे. ही यंत्रणा यशस्वी झाल्यास पुढील टप्प्याटप्याने इतर यंत्रणासुद्धा टपाल कार्यालयाच्या अखत्यारीत घेण्याचा मानस शासनाचा आहे.