Wed, May 22, 2019 23:17होमपेज › Pune › ‘इ-अ‍ॅडिक्शन’मुळे मुले एकाकी

‘इ-अ‍ॅडिक्शन’मुळे मुले एकाकी

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:44AMपिंपरी : पूनम पाटील

नुकत्याच परीक्षा संपून सुट्टया सुरु झाल्या आहेत. परंतु, सुट्यांमध्ये जिथे खेळण्याचे आवाज यायला हवे, तिथे उद्योगनगरीतील पौगंडावस्थेतील मुले व्यसनाधीन होताना दिसत आहेत. निर्जनस्थळी किंवा ग्रुपने ही मुले व्यसन करत आहेत तर दुसरीकडे उच्चभ्रू समाजातील मुले इ-व्यसनांच्या आहारी गेल्याचे विदारक चित्र या सांस्कृतिक नगरीत दिसून येत आहे. 

पौगंडावस्थेतील मुलांमध्ये वेगवेगळया प्रकारचे व्यसन जडले असल्याची सद्यस्थिती आहे. तर दुसरीकडे पालकांचे मुलांकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे. पालकांना वेळ नसल्याने मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी स्वतःहून मोबाईल, टिव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् देत आहेत. इ-अ‍ॅडीक्शनबरोबरच मुलामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंटरनेट, टिव्ही, गॅजेटस, मोबाईल यांच्या आहारी मुले जात आहेत. काही पालकांनी मुलांना दहावीचे वर्ष असल्याने वषर्र्भर टिव्ही बघू दिला नाही. हा

खरेतर अतिरेकच आहे. त्यामुळे आता परीक्षा संपल्यानंतर मुले पालकांचे अजिबातच ऐकत नसून सहा सहा तास नॉनस्टॉप बॅक टू बॅक दोन दोन फिल्म बघण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ंमैदानी खेळ नाहीसे झाले असून कौटुंबिक संवादच नाहीसा झाला आहे.

इंटरनेटमुळे व्यसनाधीनता

पूर्वी इंटरनेट वापरताना अऩेक अटी होत्या. ठराविक रकमेत अमुक एमबी डाटाच उपलब्ध व्हायचा. त्यामुळे मुलांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, आता मात्र इंटरनेट सहजरित्या उपलब्ध झाल्याने तसेच पालकही मोबाईल मुलांच्या हातात देत असल्याने मुले इंटरनेटच्या माध्यमातून नको त्या गोष्टीच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत तसेच, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत. पालकांचे मोबाईल मुले सातत्याने वापरतात. नवीन अ‍ॅप, नवीन गेम्स आदींच्या विळख्यात ही तरुण पिढी अडकली आहे. त्यामुळे या सुट्टीत आपली मुले काय करतात याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

मैदानी खेळ नाहीसे झालेत. परिणामी शारीरीक व मानसिक विकासावर याचा विपरित परीणाम होत आहे. सुट्या लागल्यामुळे मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी पर्यायच नसल्याने स्वेच्छेने स्वतःचा मोबाईल वापरण्यास देतात. परिणामी मुलांमध्ये इ ऍडीक्शन वाढत आहे. पीअर प्रेशर किंवा सहकार्‍यासाठी काहीही करायला तयार असण्याची मानसिकता  पौगंडावस्थेत असते. त्यामुऴे काहीतरी वेगऴे करुन दाखवण्याच्या नादात नेलपेन्ट रिमुव्हर, थिनर, व्हाईटनर, फेव्हीकॉल आदी गोष्टी हुंगणे तसेच वेगळे स्टंट किंवा वेगळी कृती करुन दाखवण्याच्या नादात या वयातील मुले व्यसनाधीन होत आहे. यासाठी पालकांनी मैदानी खेळात मुलांना गुंतवणे व त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधल्यास मुले व्यसनाधीन होणार नाहीत.     - डॉ. राम गुडगिला, जीवनकौशल्य प्रशिक्षक
 

Tags : pune, pune news, children, mobile, E auctioned,