Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Pune › लग्न होत नसल्याने नैराश्यातून प्राध्यापिकेची आत्महत्या

लग्न होत नसल्याने नैराश्यातून प्राध्यापिकेची आत्महत्या

Published On: Apr 10 2018 1:40AM | Last Updated: Apr 10 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी

लग्न होत नसल्याने एका  प्राध्यापिक तरुण राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. दरम्यान या तरुणीने पुण्यातील काही नामांकित महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम केले होते. तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात आई-वडिलांना त्रास देऊन नये ते खूप चांगले आहेत, असे लिहिल्याचे पोलिसांनी सांगण्यात आले. 

स्नेहल संतोष शहा (वय 34, रा. कुमठेकर रस्त्यावर 685/86, सदाशिव पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  स्नेहल या उच्चशिक्षित असून, त्या त्यांची आई, वडील आणि चुलत भाऊ यांच्यासोबत सदाशिव पेठेत राहत होत्या. त्यांनी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात नोकरी केली होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी ही नोकरी सोडून दिली होती. त्यापूर्वीही दोन ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली आहे. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्नेहल यांच्या भावाने त्यांनी ओढनीने फॅनला गळफास घेतल्याचे पाहिले. याबाबत त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांचा मृतदेह खाली काढला. 

दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मी स्वत:हून आत्महत्या करीत आहे. याला कोणालाही जबाबदार धरू नये. मी माझ्या आई-वडिलांशी कधी जास्त बोलले नाही. माझे आई-वडिल खूप चांगले आहेत, त्यांना त्रास देऊ नये, असे लिहिले आहे. अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत. 

 

Tags : pune, pune news,  professor suicide,