Thu, Jan 17, 2019 22:30होमपेज › Pune › दारूच्या नशेत इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू

दारूच्या नशेत इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू

Published On: Feb 19 2018 2:53PM | Last Updated: Feb 19 2018 2:53PMपुणे : प्रतिनिधी

मित्रांसोबत दारू पिल्यानंतर बाल्कनीतून रंग लावण्याच्या शिडीवर चढून तोल जाऊन तेराव्या मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडी येथे घडली. ४३ प्रायव्हेट या सोसायटित रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत अनुपम पाटील (वय २२, रा. एलाइट एम्पायर सोसायटी, बालेवाडी ) याचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री अनुपम हा आपल्या मित्रांसह दारू पीत बसला होता. दारू पिल्यानंतर नशेत तो बाल्कनीतील शिडीवर चढण्याचा प्रयत्न करत  होता. या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो तेराव्या मजल्यावरून खाली पडला.

या दुर्घटनेत अनुपम गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू  झाल्याचे चतु:श्रूंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी  सांगितले. यानंतर चतु:श्रूंगी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अनुपमला ससून रूग्णालयात हलवले. अनुपम हा सिंहगड अभियांत्रिकी (इंजिनिअरींग) महाविद्यालयात  शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता.