Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Pune › शीतपेय आरोग्यासाठी घातकच

शीतपेय आरोग्यासाठी घातकच

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:32AMपिंपरी : पूनम पाटील

नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अशा वेळेस जिवाची काहिली कमी करण्यासाठी शीतपेयांचा आधार घेतला जात आहे. यामुळे शीतपेयांची मागणी वाढली असून, विविध ज्यूस सेंटरवर नागरिकांची गदी होत आह; परंतु हे शीतपेय आरोग्यासाठी हानीकारक असून, त्यांचे सेवन केल्याने मधुमेह; तसेच संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्योेएवजी नैसर्गिक पेय पदार्थ सेवन करावेत,  असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

उसाचा रस किंवा फळांच्या रसाबाबत साशंकता
हल्ली फळांचे किवा भाज्यांचे रसांबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या आवळा किंवा भोपळ्याचा रस बाजारात बंद बाटलीत उपलब्ध आहे. हा रस  महिनोन्महिने चांगला कसा राहू शकतो, असा प्रश्‍न सुजाण नागरिकांना पडला आहे. सध्या उसाच्या रसालाही पसंती मिळत असून, तो जरूर प्या; परंतु त्यासाठी डिस्पोजेबल ग्लासचा आग्रह धरावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. रसवंतीमध्ये मिळणारे ग्लास नीट स्वच्छ केले जात नाहीत. त्यामुळे कावीळ; तसेच संसर्गजन्य रोगांचा धोका जास्त असतो. यासाठी रसवंतीमध्ये डिस्पोजेबल ग्लास वापरणे बंधनकारक करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. बाटलीबंद रसांमध्ये आवळ्यासारख्या फळांचा रस कमी अन प्रिझर्व्हेटीव्हचे प्रमाणच सर्वाधिक असल्याने याबाबतही ग्राहकांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केल आहे. 

रस्त्यावरील फळांच्या रसालाही आता अधिक मागणी आहे; परंतु त्यामुळे जंतुसंसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. यात बर्‍याच वेळा अशुद्ध बर्फाचा यात वापर होताना दिसतो. हातगाड्यांवर मिळणार्‍या रस किंवा पेयांमध्ये वापरले जाणारे फ्लेअर एजंट हेही घातक असतात; तसेच सध्या उद्यानाबाहेर मिळणारे रसही घातक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या रसात मिसळण्यात येणार्‍या काही वनस्पती या सर्वांना सूट होतील असे नाही. या रसामुळे नुकतेच एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागल्याची घटना शहरात घडली आहे. त्यामुळे जाहिरातबाजीला न भुलता नैसर्गिक पेयांचा वापर करणे कधीही चांगले, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.