Tue, Feb 19, 2019 15:03होमपेज › Pune › एड्सबाधितांसाठी सायकलवारी

एड्सबाधितांसाठी सायकलवारी

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 12:56AMपिंपरी : प्रतिनिधी

एड्स बाधितांच्या रक्षणासाठी पंढरीच्या विठुरायाला साकडे घालण्यासाठी डॉ. पवन चांडक  सलग पाचव्या वर्षी आळंदी ते पंढरपूर अशी सायकल वारी करीत आहेत.  डॉ. चांडक व त्यांचे सहकारी आकाश गीते या दोघांनी शुक्रवारी (दि.13) सकाळी संत ज्ञानेश्वरांच्या  समाधीचे दर्शन घेऊन वारीला सुरूवात केली. 

एड्स बाधितांच्या पुनर्वसनासाठी परभणीतील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेचे अध्यक्ष डॉ.चांडक काम करीत आहेत. पंढरीच्या पाडुरंगाला एड्सबाधित मुलांच्या संरक्षण व  हितसंवर्धनासाठी साकडे घालण्यासाठी ते दरवर्षी आषाढी वारीनिमित्त सायकल वारी उपक्रम राबवतात. 

डॉ. चांडक व सहकारी गीते यांनी शुक्रवारी पंढरीच्या दिशेने वारी सुरू केली. पुण्यातील शनिवारवाडा  येथे जाऊन पुढे भिगवणमध्ये ते मुक्काम करणार आहेत. शनिवारी (दि.14) इंदापूर, वेळापूरमार्गे पंढरपुरात जाऊन विठ्ठल मंदिराचे दर्शन घेणार आहेत. नंतर 85 एड्सग्रस्त विद्यार्थांच्या पालवी प्रकल्पाला भेट देऊन  रविवारी (दि.15) पंढरपूरजवळील कुर्डुवाडी येथे वारीचा समारोप करणार आहेत.  केवळ स्वयंसेवी संस्थ्यांच्या भेटी गाठी घेत हे दोघे जण सायकल वारी करत आहेत. डॉ. चांडक व पत्नी आशा चांडक एड्सबाधित मुलांचा सांभाळ करत आहेत.