Tue, Jul 16, 2019 13:35होमपेज › Pune › भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबद्दल साशंकता : पालकमंत्री बापट

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबद्दल साशंकता : पालकमंत्री बापट

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर झाला असून, या कुत्र्यांवर केली जाणारी शस्त्रक्रिया व नसबंदी योग्य पद्धतीने होत नाही. या नसबंदीबाबत शंकाच आहे. या यंत्रणेवर काटेकोरपणे देखरेख आणि यंत्रणा आणखी सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करत पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. 

शहरातील लहान मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालय येथे साकारण्यात आलेल्या इन्सिनरेटर प्रकल्पाचे उद्घाटन गिरीश बापट यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी खासदार प्रदीप रावत, आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले, शहरात कुत्र्यांची संख्या किती आहे, याचा नेमका आकडा कळत नाही. मात्र भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भटक्या आणि पाळीव मृत पाळीव प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा आजवर शहरात उपलब्ध नव्हती, त्यामुळे मृत प्राणी उघड्यावर टाकण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. 

भविष्यात म्हैस, घोडा यांसारख्या मोठ्या जनांवरासाठीही विद्युतदाहिनी तयार करण्यात येईल. प्रास्ताविक महापौर टिळक यांनी तर सूत्रसंचालन डॉ. कमलकांत वडेलकर यांनी केले. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.