Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Pune › चिमुरड्यावर कुत्र्यांचा हल्ला

चिमुरड्यावर कुत्र्यांचा हल्ला

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:08AM

बुकमार्क करा
पुणे/ चंदननगर : प्रतिनिधी 

खराडी परिसरात भटक्या कु त्र्यांनी उच्छाद मांडला असून बुधवारी  अंगणात खेळत असलेले  दीड वर्षीय बालक मनित गाडेकर याच्यावर त्यांनी हल्ला केला. बालकाच्या चेहर्‍याचा चावा घेतल्याने त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

मनित घरासमोरील अंगणात खेळत होता. त्यावेळी त्याची आईही जवळच होती. अचानक अंगणात काही भटकी कुत्री आली. त्यांनी काही कळण्याच्या आत मनितवर हल्ला केला. आईने प्रसंगावधान दाखवत कुत्र्याच्या तावडीत सापडलेेल्या मनितला सोडवले.  कुत्र्याने मनितच्या उजव्या डोळ्याची पापणी फाडली असून त्यामुळे बुबळ बाहेर आले आहे.  मनितच्या डोळ्याजवळ आठ दात लागले असून, खासगी रुग्णालयात त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

भटक्या कुत्र्यांनी परिसरात उच्छाद मांडला असतानाही मनपा श्वान पथक याकडे कानाडोळा करत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.