होमपेज › Pune › तिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार

तिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:28AMदोडामार्ग : प्रतिनिधी

तिलारी घाटाचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सोमवार 5 फेबु्रवारीपासून हा घाट वाहतुकीस खुला केला जाणार आहे. वाहनांची वर्दळ देखील घाट रस्ता सुुस्थितीत झाल्याने वाढलेली दिसणार आहे.
घाटाच्या पायथ्याशी 1 बाय 66 मेगावॅट जलविद्युत केंद्राकडे यंत्र सामुग्री नेण्यासाठी तिलारी घाट बनविण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या खासगी घाटातून सर्व वाहनांना प्रवेश बंद होता. तरीपण बेळगाव, कोल्हापूर, गोवा येथे जाणारे वाहनचालक या घाट मार्गाचा वापर करू लागले. त्यातच घाटातून गेल्या काही वर्षांपासून अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला.

ठिकठिकाणी खड्डयाचे  मोठे साम्राज्य पसरल्याने वाहने सोडाच पण पायी जाणे देखील धोकादायक बनले होते. रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकीचा असून देखील हा विभाग रस्ता दुरुस्तीसाठी निधी खर्च करत नव्हता. तर बांधकाम विभाग हा घाटमार्ग आपल्या ताब्यात नसल्याने दुरुस्तीचे काम हाती घेत नव्हता. मध्यंतरी पाटबंधारे विभागाने हा 7 कि.मी. चा घाट बांधकामकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केला. पण दुरुस्तीसाठी कोटयावधी रूपयांची गरज असल्याने त्यांनी ताब्यात  घेण्यास नकार दिलेला होता. बांधकामकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केला. पण दुरुस्तीसाठी कोटयावधी रूपयांची गरज असल्याने त्यांनी ताब्यात घेण्यास नकार दिलेला होता. जवळपास 3 महिने घाटदुरूस्ती हा घाटमार्ग बंद होता.

 बांधकाम विभागाने डांबरीकरणाचे काम दर्जेदार केल्याचे निदर्शनास येते. यामुळे हा घाटमार्ग सोमवार 5 फेबु्रवारी पासून वाहतुकीस खुला होणार आहे. तिलारी घाट 7 कि.मी.चा असून हा मार्ग सुस्थितीत झाला खरा पण नागमोडी वळणावर व तीव्र उतारावर रस्त्यालगत असलेले संरक्षक कठडे कोसळलेल्या स्थितीत जैसे त्या स्थितीतच आहे. अशा कठडयांना दुरुस्त व मजबूत करणे गरजेचे आहे. पण तसे झाले नाही.