Sun, Apr 21, 2019 14:11होमपेज › Pune › पुण्यात कडक बंदोबस्तात ‘पद्मावत’ सुरळीत प्रदर्शित

पुण्यात कडक बंदोबस्तात ‘पद्मावत’ सुरळीत प्रदर्शित

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 26 2018 12:50AMपुणे : प्रतिनिधी 

बहुचर्चित आणि  वादाच्या भोवर्‍यात अडकलेला पद्मावत सिनेमा पुणे शहरात सुरळीत आणि शांततेत प्रदर्शित झाला. या वेळी शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. 

राजस्थानमधील सेनेने केलेला विरोध आणि निदर्शने यामुळे देशात चित्रपट प्रदर्शनावर प्रश्‍नचिन्ह लावण्यात आले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यावर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गोवा वगळून इतर सर्व राज्यांत चित्रपट प्रदर्शित झाला.

पुणे शहरातही या चित्रपटाला झालेल्या विरोधातून वडगाव पुलाजवळ तोडफोडीची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांनी कोणताही धोका न उचलता प्रत्येक चित्रपटगृहाला संरक्षण दिले होते. यासाठी शहरातील 50 अधिकारी, 250 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शहरातील सर्वच ठिकाणी चित्रपगृहात ‘पद्मावत’ बघण्यास प्रेक्षकांनी गर्दी केल्याची दृश्ये बघायला मिळाली. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे सर्व तिकिटे संपल्याची स्थिती दुपारीच निर्माण झाली होती.