होमपेज › Pune › टॅ्रफिक वॉर्डनच्या वेतनास विलंब

टॅ्रफिक वॉर्डनच्या वेतनास विलंब

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 11:51PMपिंपरी : पूनम पाटील

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वॉर्डन देण्यात आले. वाहतूक व्यवस्थापनात मोलाची कामगिरी बजावणार्‍या या वॉर्डनला जून संपत आला तरी अद्याप वेतन मिळालेले नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत चौकशी  केली असता काही तांंत्रिक कारणांमुळे वेतनास विलंब होत असल्याचे संबंधित सुपरवायझरकडून सांगण्यात आले.लप नाही की, आयकार्ड नाही

पेस्क्रिीस्टल कंपनीकडे वर्ग केल्यापासून दर महिन्याचा शेवटचा आठवडा संपत आला तरी वेतन दिले जात नाही. याबाबत विचारणा केली असता सुपरवायझर उडवाउडवीची उत्तरे देतात. जेव्हापासून कामावर रुजू झालो आहोत तेव्हापासून पेमेंटस्लिपच मिळाली नाही. ती मागायला गेल्यास नोकरीवरुन कमी करण्याच्या धमक्या दिल्या जातात. प्रत्यक्षात सतरा अठरा हजार रुपये पगार असून हातात केवळ साडेसात हजार रुपयेच मिऴतात. जास्त रक्कम असलेल्या पगारपत्रकावर सह्या घेऊन प्रत्यक्षात मात्र, कमी पगार दिला जात असल्याच्या तक्रारी टॅ्रफिक वॉर्डननी केल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत पालिकेने कित्येक कोटी रुपये वॉर्डनच्या वेतनापोटी खर्च केले आहेत. मात्र, हे वेतन वेळच्यावेळी मिळत नसून याबाबत कोणाकडे दाद मागायची असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. 

2006-07 पासून पिंपरी-चिंचवड पालिकेने वाहतूक विभागासाठी वॉर्डनची नेमणूक केली. परंतु, ठेकेदारांकडून  सातत्याने वॉर्डनची पिळवणूक केली जात आहे. पगार घेणारे ठेकेदार हातात निम्मीच रक्कम टेकवत असल्याचा आरोप वॉर्डननी केला आहे. वॉर्डनवर सर्व जबाबदारी सोपवून वाहतूक पोलिस स्वतः गायब असतात. वार्डनला एकही वाहनचालक दाद देत नाहीत. ते चौकात उन-पावसात शोभेचे बाहुले बनून राहिले आहेत, अशी खंत त्यांच्यातील काही जणांनीच व्यक्त केली. वाहतूक नियमनाऐवजी  इतर कामेच करावी लागतात. त्यात पगार वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे घरभाडे, किराणा तसेच मुलांच्या शांळांचा खर्च  कसा भागवायचा असा सवाल त्यांनी केला आहे.  दरम्यान, पेंडंसीचे कोणतेही प्रकरण विभागाकडे आले नसून याबाबत चौकशी करण्यात येईल असे उत्तर महापालिकेच्या वतीने देण्यात आले.