Thu, Apr 25, 2019 21:55होमपेज › Pune › ‘पोलिस महासंचालक सन्मान’ जाहीर

‘पोलिस महासंचालक सन्मान’ जाहीर

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना राज्याच्या पोलिस महासंचालक यांच्याकडून दिले जाणारे  ‘पोलिस महासंचालक सन्मान’ जाहीर करण्यात आले आहेत. यात पुणे शहर व ग्रामीण पोलिस दल, तसेच राज्य राखीव दलातील  65 अधिकारी आणि  कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पोलिस दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल दरवर्षी हे सन्मानचिन्हे दिली जातात. महाराष्ट्रदिनी (एक मे) ही सन्मानचिन्हे आयुक्तालयात होणार्‍या संचलनावेळी प्रदान करण्यात येतात. हा सन्मान पटकावणार्‍यांमध्ये पुण्यातील पोलिस उपअधीक्षक/ सहाय्यक पोलिस आयुक्त ः अण्णासाहेब मारुती जाधव (सासवड, पुणे ग्रामीण) यांचा समावेश आहे. 

इतर पुरस्कारप्राप्त अधिकार्‍यांमध्ये पोलिस निरीक्षक ः महंमद हनीफ महंमद युनुस मुजावर (बंडगार्डन पोलिस ठाणे), किरण पीटर साळवी (खडक पोलिस ठाणे), दयानंद सदाशिव गावडे (स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण), रामचंद्र कृष्णाजी कुदळे (गुन्हे अन्वेषण विभाग), दत्तात्रय आनंदराव पाटील (वाहतूक शाखा, पुणे शहर), मुकुंद राजाराम महाजन (येरवडा पोलिस ठाणे), विलास तुळशीराम सोंडे (विमानतळ पोलिस ठाणे), अजय सुभाष चांदखेडे (सांगवी पोलिस ठाणे), अरुणकुमार बबनराव सपकाळ (गुन्हे अन्वेषण विभाग), जितेंद्र वसंतराव कोळी (वाहतूक शाखा पुणे शहर),सुभाष आप्पासाहेब निकम (गुन्हे अन्वेषण विभाग), अशोक आनंदराव कदम (येरवडा पोलिस ठाणे)

सहाय्यक पोलिस निरीक्षक ः चंद्रशेखर मोहनराव यादव (विशेष पथक, पुणे ग्रामीण), राजेंद्र जगन्नाथ मगर (विशेष शाखा -2 पुणे शहर), यशवंत गणपतराव निकम (गुन्हे अन्वेषण विभाग), संतोष एकनाथ खेतमाळस (वाहतूक शाखा, पुणे शहर), गिरीषा अभ्युदय निंबाळकर (गुन्हे अन्वेषण विभाग), सीमा सचिन गायकवाड (गुन्हे अन्वेषण विभाग), रुणाल सुजाउद्दीन मुल्ला (गुन्हे अन्वषण विभाग).
पोलिस उपनिरीक्षक ः किशोर मुकुंद अत्रे (बिनतारी संदेश विभाग), संतराम पांडुरंग गायकवाड (पोलिस मुख्यालय पुणे शहर), प्रदीप नामदेव तांगडे (महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी, पुणे), घनशाम धनाजी भोसले (रारापोबल गट-2 पुणे), विजय परशुराम पाटील (तांत्रिक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ः राजेंद्र एकनाथ कोंढरे (सिंहगड पोलिस ठाणे), विलास बाबूराव जाधव (समर्थ पोलिस ठाणे), यशवंत बाबूराव ओंबासे (सिंहगड पोलिस ठाणे), जयसिंग खाशाबा संकपाळ (यादव) (पोलिस मुख्यालय, पुणे शहर), अंकुश निवृत्ती किर्दक (रारापोबल गट-2 पुणे), सोमनाथ रामचंद्र पवार (वाहतूक शाखा, पुणे शहर), प्रकाश शीतलप्रसाद परदेशी (वाहतूक शाखा, पुणे शहर), बाळासाहेब सखाराम उजगरे (विशेष शाखा, पुणे शहर), सुभाष जगन्नाथ कुंभार (गुन्हे शाखा पुणे शहर), महंमद गुलाब शेख (गुन्हे शाखा, पुणे शहर), नामदेव सिद्धनाथ राऊळ (रारापोबल गट-2 पुणे), चंद्रकांत यशवंत शितोळे (मोटार परिवहन विभाग, पुणे शहर), अजय चंद्रकांत महिंद्रकर (बनतारी संदेश विभाग, पुणे)

पोलिस हवालदार ः हुसेन साहेबलाल पठाण (हडपसर पोलिस ठाणे), पॉल राज अ‍ॅन्थोनी (विशेष शाखा -1), आनंद सदाशिव खाडे (नियंत्रण कक्ष गुन्हे अन्वेषण विभाग), चंद्रकांत वामन गुरव (गुन्हे शाखा), प्रमोद ज्ञानेश्वर ढेरंगे (वाहतूक शाखा, पुणे शहर), अर्जुन सदाशिव दिवेकर (गुन्हे शाखा), सुरेश दौलत भोई (सासवड पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण), रवींद्र विष्णू सुतार (रारापोबल गट -2), अनंत सीताराम दळवी (हिंजवडी पोलिस ठाणे), हरिश्चंद्र सुधाकर केंजळे (वारजे-माळवाडी पोलिस ठाणे), दिपक महादेव खरात (गुन्हे शाखा), मोरेश्वर रामचंद्र इनामदार (स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण), दत्तात्रय राजाराम ठोंबरे (रारापोबल गट-1), संभाजी सुधाकर नाईक (कोंढवा पोलिस ठाणे), संजय एकनाथ पवळे (दिघी पोलिस ठाणे), सुनील शिवाजी बोरकर (वाहतूक शाखा, पुणे शहर), राकेश संभाजी गुजर (डेक्कन पोलिस ठाणे), सुरेश हरिभाऊ विधाने (गुन्हे अन्वेषण विभाग), दत्तात्रय मच्छिंद्र जाधव (शिवाजीनगर पोलिस ठाणे), अनिल भालचंद्र साबळे (बिनतारी संदेश विभाग), दिलीप दिगंबर झानपुरे (गुन्हे अन्वेषण विभाग), अशपाक सय्यद करीम इनमदार (गुन्हे शाखा), संतोष बापूराव मोहिते (गुन्हे शाखा), अजय नारायण राणे (वाहतूक शाखा), विनोद विलास भंडलकर (भारती विद्यापीठ पोलिस ठाणे), श्रीमती स्मिता मच्छिंद्र आमोंडकर (गुन्हे शाखा), संजय बाजीराव जगदाळे (स्थानिक गुन्हे शाखा).