Wed, Jul 17, 2019 10:32होमपेज › Pune › महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍तपदी दिलीप गावडे

महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍तपदी दिलीप गावडे

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 1:23AMपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ वर्गात समावेश झाल्याने दोन अतिरिक्त पदाची आवश्यकता होती. त्यानुसार सह आयुक्त दिलीप गावडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या इतिहास प्रथमच दोन अतिरिक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी उपलब्ध झाले आहेत.

राज्य शासनाच्या राज्यातील सर्व महापालिकेच्या सुधारित वर्गीकरणानुसार पिंपरी-चिंचवड पालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला. पालिकेत अतिरिक्त आयुक्त दर्जाचे दोन पदे निर्माण करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. पालिकेत सदर पदासाठी शासन प्रतिनियुक्तीवरील 1 व पालिका अधिकार्‍यांकरीता 1 पद निर्माण केले आहे.

अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी शासन प्रतिनियुक्तीवर आलेले अच्युत हांगे त्याची तडाफडी लातूर महापालिकेत बदली झाली. त्याच्या जागी सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची प्रभारी अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. पालिका अधिकार्‍यांचे एक पद रिक्त असल्याने त्या जागी सह आयुक्त गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.16) काढला आहे. 

गावडे यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन, आरोग्य विभागातील स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान, पर्यावरण अभियांत्रिकी, अग्निशामन, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, कामगार कल्याण, सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, अभिलेख कक्ष, अतिक्रमण विभाग (मुख्यालय), स्थानिक स्वराज संस्था आदी विभाग देण्यात आले आहेत.  तर, आष्टीकर यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (उद्यान), शिक्षण मंडळ (प्राथमिक), माध्यमिक शिक्षण विभाग, आयआटीआय, निवडणूक, जनगणना, वैद्यकीय विभाग, वायसीएम रूग्णालय, पशुवैद्यकीय, विद्युत मुख्य कार्यालय, कार्यशाळा, दुरसंचार, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन, झोनिपु (स्थापत्य), नागरसवस्ती योजना, उद्यान व वृक्ष संवर्धन आणि नागरी सुविधा केंद्र आदी विभागाची जबाबदारी आहे.