Tue, Mar 19, 2019 03:22होमपेज › Pune › डिजीटल लायसन्स आले हो!

डिजीटल लायसन्स आले हो!

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

वाहन चालविताना आवश्यक लायसन्स आणि आरसी बुक बाळगताना नागरिकांची होणारी तारांबळ आता संपुष्टात आली आहे. मोबाईलमध्ये ‘डीजीलॉकर’ अ‍ॅपच्या मदतीने लायसन्स आणि वाहनांची कागदपत्रे जतन केली जाणार आहेत. डिजीटल यंत्रणेमुळे लायसन्स हरवणे, वाहनांचे आरसी बुक न मिळणे, अशा तक्रारींना वाव राहणार नाही. केंद्र शासनाच्यावतीने ‘डीजीलॉकर अ‍ॅप’चे नुकतेचउद्घाटन करण्यात आले आहे. या अ‍ॅपबद्दल माहिती देण्यासाठी आरटीओ कार्यालयात  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

केंद्रीय भुपृष्ठ मंत्रालय व माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने लायसन्स आणि आरसीबुकचे ‘डीजीलॉकर’ अ‍ॅपशी जोडणी करण्यात आली आहे. कागदपत्रांचा कमीत कमी वापर करण्यासाठी शासनाच्या वतीने नवीन अ‍ॅपची सुरुवात करण्यात केली आहे. 

त्यासाठी नागरिकांना ‘डीजी लॉकर डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर खाते उघडणे बंधनकारक आहे. त्यासाठी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असणे गरजेचे आहे. देशभरात तब्बल 24 कोटी वाहनांचे आरसी बुक त्यावर उपलब्ध करण्यात आले आहेत. तर 10 कोटी नागरिकांचे लायसन्स अपलोड करण्यात आले आहेत. ‘डीजीलॉकर’ संकेतस्थळावर 2006 पासून सर्व डेटा उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

‘डीजी लॉकर’ आणि ‘एम परिवहन अ‍ॅप’ एकमेकांना जोडण्यात आले असून, त्याचा वाहतूक कर्मचार्‍यांसहित नागरिकांना फायदा होणार आहे. मोबइलवर अ‍ॅपच्या माध्यमातून लायसन्स आणि आरसीबुक दाखविल्यास वाहतूक कर्मचार्‍यांकडून वाहनचालकांची  सुटका केली जाणार आहे. अ‍ॅपमुळे कागदपत्रांच्या वैधतेबाबत शंका उपलब्ध होणार नाही. 

तपासणी यंत्रणेला ‘क्युआर कोड’ उपलब्ध झाल्यामुळे फेरफार आणि फसवणुकीची शक्यता राहणार नाही. पत्रकार परिषदेला प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे, आनंद पाटील, दीपक सोनार, संगीता मेढे उपस्थित होते.