Fri, May 24, 2019 06:24होमपेज › Pune › मार्च एण्डिंगच्या नावाखाली ग्राहक वेठीस

मार्च एण्डिंगच्या नावाखाली ग्राहक वेठीस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दिघी :  बापू जगदाळे

सध्या विद्युत विभागाकडून वसुलीच्या व मार्चअखेरच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांना त्रास दिला जात आहे. कोणतीही कल्पना न देता थकीत बिलासाठी वीज जोड तोडण्याबरोबरच मीटर काढून घेण्याचे प्रकार दिघी, भोसरी, नेहरूनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होत आहेत. तसेच, आर्थिक देवाण घेवाणीचा प्रयत्न देखील विद्युत कर्मचार्‍यांकडून केला जात असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे. विद्युत विभागाकडून थकीत वीजबिल वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. परंतु, ही वसुली करताना विद्युत विभागाकडून मोठी धेंडे सोडून सर्वसामान्य ग्राहकांनाच वेठीस धरण्याचे काम सुरू आहे.

मोठमोठ्या कंपन्यांकडे लाखोंची वीजबिले थकीत असताना त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई केली जात नाही. परंतु, ज्या ग्राहकांचा घरगुती वापर आहे व काही कारणामुळे त्यांना वीजबिल भरता आले नाही, अशा ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता सर्रास त्यांची वीज जोड खंडित केली जात आहे. फक्त एवढेच न करता त्यांचे वीज मीटरच तोडून घेऊन जात असल्याचेही प्रकार सुरू आहेत. बिल भरल्यानंतर देखील वीज जोडसाठी विद्युत कर्मचार्‍यांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याचे भोसरीतील काही ग्राहकांनी सांगितले. भोसरी परिसरात अनेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जात आहे. त्यावर मात्र कारवाई करण्याचे धाडस दाखवत नसल्याचे अभिमन्यू थोरात यांनी सांगितले.
 


  •