Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Pune › मते, कांचन, धाडवे, जाधव अव्वल

मते, कांचन, धाडवे, जाधव अव्वल

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:16AMपुणे : प्रतिनिधी

महापौर चषक ज्युदो स्पर्धेतील मुलींच्या विविध वजनी गटामध्ये जान्हवी जाधव, सेजल धाडवे, गौतमी कांचन, तन्वी मते यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करित अव्वल क्रमांक पटकाविला.
पुणे जिल्हा ज्युदो असोसिएशन आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने ही स्पर्धा टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या बॅडमिंटन हॉल येथे सुरु आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शैलेश टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे रोहित टिळक, महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये 10 ते 11 वर्षाखालील गटात श्रीवणी सितापने प्रथम क्रमांक, विरा सांगळेने व्दितीय तर प्रियंका पवारने तृतीय क्रमांक पटकाविला. 

25 किलोवरील वजनी गटामध्ये लावण्या मॅडमने प्रथम क्रमांक, सुशिला कोकरेने व्दितीय क्रमांक तर आकांक्षा मोरेने तृतीय क्रमांक पटकाविला. 25 किलो वजनी गटामध्ये जान्हवी जाधवने प्रथम क्रमांक, श्‍वेता ढवळेने व्दितीय तर हेमांती सातपुतेने तृतीय क्रमांक पटकाविला. 30 किलो वजनी गटामध्ये निकिता ढवणेने प्रथम क्रमांक, अलिशा निस्तानेने व्दितीय तर वैभवी जायगुडेने तृतीय क्रमांक पटकावित विजेतेपद पटकाविले. 

30 किलो वजनी गटामध्ये सेजल धाडवेने प्रथम क्रमांक, सई शिंदेने व्दितीय तर उन्‍नती जांभुळकरने तृतीय क्रमांक पटकाविला. 35 किलो वजनी गटात अंशिका विश्‍वकर्माने प्रथम क्रमांक, शर्वरी भाऊडुेलेने व्दितीय क्रमांक तर सुनैना स्वामीने तृतीय क्रमांक मिळविला. 35 किलोवरील वजनी गटात गौतमी कांचनने प्रथम, पियुषा ढमालेने व्दितीय तर आचल मतेने तृतीय क्रमांक पटकाविला. 40 किलो वजनी गटात एकमेव तन्वी मते ही खेळाडू सहभागी झाली.