Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Pune › धायरीतील तो स्फोट प्रेमभंगातून

धायरीतील तो स्फोट प्रेमभंगातून

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 12:45AMपुणे ः

धायरीतील डीएसके रोडवरील अलोक पार्क इमारतीजवळ स्फोट केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तरुणीसोबत प्रेमभंग झाल्यानंतर तिला धडा शिकविण्यासाठी घराजवळ स्फोट केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

किशोर आत्माराम मोडक (20, वडकी, सासवड रोड) व अक्षय राजाभाऊ सोमवंशी (24, वडकी) अशी त्यांची नावे आहेत. धायरी येथे डीएसके रोडवरील अलोक पार्क इमारतीजवळ बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास फटाक्यासारख्या स्फोटाने परिसरात दहशत पसरली होती. एका खिडकीची काचही या स्फोटाने फुटली. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही तपासले.

त्यानंतर या परिसरात दोघांनी चारचाकी वाहनातून येऊन स्फोट केल्याचे समोर आल्यावर त्या गाडीचा शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर किशोर मोडक याच्याकडे चौकशी केली, तेव्हा डीएसके रोड परिसरात त्याची मावशी राहते. तिच्याकडे त्याचे नेहमी येणे-जाणे होते. त्या वेळी त्यांच्या शेजारी राहणार्‍या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते.