Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Pune › डॉ. अमोल कोल्हे यांना धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार

अमोल कोल्हेंना धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 1:06AMकोरेगाव भीमा : प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराज यांच्या 329 व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त वढूत झालेल्या कार्यक्रमात राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना; तर शंभू सेवा पुरस्कार  इंदूर येथील युवराज विष्णू वस्ताद काशिद व राजीव जाधव यांना देण्यात आला. 

या वेळी मंत्री तावडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज ही प्रेरणास्थाने असून, वढू येथील संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनाने मंत्रिगटाची स्थापना केली असून, त्यांच्या नियमित बैठका होत आहेत.  

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी, छत्रपती संभाजी महाराज यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे, हार मानायची नाही हे शिकविले. छत्रपती संभाजींनी रयतेचे राज्य व स्वराज्य राखण्यासाठी बलिदान दिले. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा  इतिहास मालिकेद्वारे  घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असून, छत्रपती संभाजी महाराजांचे वढू येथील हे समाधीस्थळ  प्रेरणास्रोत असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी वढू येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन वढू बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. 

Tags : pune, pune news, Amol Kolhe, Dharmaveer Sambhaji Maharaj Award