Thu, Apr 25, 2019 11:28होमपेज › Pune › सव्वा कोटीचे अंमली पदार्थ नष्ट

सव्वा कोटीचे अंमली पदार्थ नष्ट

Published On: Feb 07 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 1:07AM पुणे : प्रतिनिधी

पुणे शहरात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सव्वा कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या 28 वर्षात प्रथमच न्यायालयात गुन्ह्यांचा निकाल लागण्यापूर्वी हा साठा नष्ट करण्यात आला आहे. एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम 52 -अ (2) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्यांमध्ये अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर आयुक्तालय तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाअंतगत तो नष्ट करण्यासाठी तीन सदस्य समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या अध्यक्ष पुणे पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त तसेच पोलिस अधीक्षक आणि लोहमार्ग पोलिस अधीक्षक हे सदस्य आहेत.   

पुणे शहर पोलिस कार्यक्षेत्रातील अंमली पदार्थ कायद्यान्वये आयुक्तालयात शहरात दाखल करण्यात आलेल्या एकूण 9 गुन्ह्यांमध्ये जप्त 1 कोटी 16 लाख 23 हजार 500 रुपयांचा  मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे. 9 गुन्ह्याचा सत्र न्यायालयात न्यायनिर्णय प्रलंबित आहेत. पुणे पोलिसांनी एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम 52 -अ (2) अन्वये 28 वर्षात प्रथमच हा साठा नष्ट केला आहे.  नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थामध्ये 562 किलो गांजा, मिक्स तरंग शिवामृत 352 किलो, गांजा मिक्स फलादी पूर्ण 11 किलो, गांजा मिक्स भांगयुक्त मँगो चुर्ण 44 किलो, भांग 11 किलो, चरस 1 किलो हे मुंढवा येथील भारत फोर्ज येथील भट्टीमध्ये जाळून नष्ट केले.  ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक मुगळीकर, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सुनील दोरगे, स्वाती थोरात यांनी केली.