Wed, Nov 14, 2018 12:11होमपेज › Pune › पंधरा दिवसांत ५० कोटी जमा करा; डीएसकेंना न्यायालयाचे आदेश

पंधरा दिवसांत ५० कोटी जमा करा; डीएसकेंना न्यायालयाचे आदेश

Published On: Dec 04 2017 4:59PM | Last Updated: Dec 04 2017 4:59PM

बुकमार्क करा


पुणे : प्रतिनिधी

बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांना पंधरा दिवसांत ५० कोटी जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. पैसे जमा न केल्यास त्यांना देण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द केला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून डीएस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी विशेष न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच कोल्हापूर आणि इतर शहरांमध्येही गुन्हेगारांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुण्यात ३५१ ठेवीदारांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी आल्या होत्या. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असला, तरी आता न्यायालयाने ५० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिल्याने डीएसकेंच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे मानले जात आहे.