Tue, Feb 19, 2019 22:24होमपेज › Pune › मार्गशीर्षामुळे फळांना मागणी

मार्गशीर्षामुळे फळांना मागणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या उपवासामुळे विविध प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कायम असल्याने सर्व फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. दरम्यान, काश्मीरमध्ये पाऊस सुरू झाल्याने सफरचंदाची आवक घटली असून दरात पेटीमागे 50 रुपये, तर हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने सीताफळाच्या दरात 5 ते 7 रुपयांनी वाढ झाली आहे. तर आवक वाढल्याने लिंबू आणि बोरांच्या दरात घट झाली आहे. जिल्ह्याच्या तुलनेत गुजरातमधील भावनगर, अहमदाबाद तसेच सुरत येथून बोरांना मोठी मागणी असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. 

रविवारी येथील फळबाजारात अननस 5 ट्रक, मोसंबी 80 टन, संत्री 3 टन, डाळिंब 70 ते 80 टन, पपई 20 ते 25 टेम्पोे, लिंबाची 6 ते 7 हजार गोणी, चिकू 2 हजार बॉक्स, पेरू 1 हजार क्रेट्स, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, खरबूज 10 ते 15 टेम्पो, सफरचंद 8 ते 10 हजार पेटी, बोरे साडेतीन हजार गोणी, द्राक्षे 2 टन, स्ट्रॉबेरी 1 ते दीड टन, सीताफळ 2 टन इतकी आवक झाली

फळांचे दर पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रति गोणी) : 30-80, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 200-280, (4 डझन ) : 130-200, संत्रा : (3 डझन) 120-250, (4 डझन) : 80-140, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 15-60, गणेश 05-20, आरक्ता 10-30. कलिंगड : 05-10, खरबुज : 10-25, पपई  : 05-20, चिकू : 100-500, पेरू (20 किलो) : 300-500, सीताफळ : 15-100. सफरचंद : सिमला (20 ते 25 किलो) : 1100-1500, काश्मीर डेलीशियस (15 किलो) 700-1300, किन्नोर : (25 किलो) 1500-2300, अमेरिकन डेलीशियस : (15 किलो) 1000-1200, महाराजा ( 15 किलो) : 500-700. बोरे : चेकनट (10 किलो) 450-500, चण्यामण्या : 250-280, चमेली : 80-100, उमराण : 60-70, द्राक्षे : तास गणेश (15 किलो) 900-1200, जम्बो (10 किलो) : 900-1250.