Wed, Jun 26, 2019 17:53होमपेज › Pune › भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:20PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

बुधवार पेठ येथील भिडे वाडा गेली अनेक वषार्र्ंपासून पडक्या अवस्थेत आहे. भिडे वाड्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून भिडे वाड्याचे जतन व्हावे यासाठी लवकरात लवकर भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, अशी मागणी भिडे वाडा बचाव मोहिमेचे प्रमुख प्रशांत फुले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

फुले म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिला शाळा सुरु केली. त्याकाळच्या समाजाच्या त्रासाला झुगारून सावित्रीबाईंनी आपला लढा सुरु ठेवला. त्यांच्या या सर्व गोष्टीत महत्वाचा साक्षीदार असलेला भीडेवाडा आता मोडकळीस आला असून शेवटच्या घटका मोजत आहे.

याविरोधात भिडे वाड्याखाली असलेल्या गाळेधारकांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. परंतु महापालिका या गाळेधारकांना पर्यायी जागा देण्यास तयार असून यासंदर्भात सरकारने समंजसपणे सुवर्णमध्य काढला पाहिजे. ज्या भिडे वाड्यात स्त्रिया शिकल्या त्या वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे व त्याठिकाणी पुन्हा गरीब- मुलांसाठी शाळा सुरु करण्यात यावी, असेही फुले यांनी यावेळी सांगितले.