Tue, May 21, 2019 18:46होमपेज › Pune › परीट समाजाची आरक्षणाची मागणी

परीट समाजाची आरक्षणाची मागणी

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:58AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील परीट (धोबी) समाजाचा राज्य शासनाने अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा. आमच्या समाजाला आरक्षण मिळाले नाही तर  येत्या काळात परीट समाज मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र परीट (धोबी) समाजाच्या वतीने आरक्षण कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष अनिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

अखिल भारतीय समाज संस्थेचे सचिव राजू आहेर, लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पवार आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात परीट समाज मोठ्या प्रमाणात असून, या समाजाला पूर्वापार अनुसूचित जातीच्या सवलती देण्यात येत होत्या; परंतु राज्य शासनाने 1976च्या केंद्राच्या घटना दुरुस्तीनंतर राज्यात सवलती लागू न केल्यामुळे या समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन आरक्षण लागू करावे, अशी मागणी या समाजाकडून करण्यात आली आहे. 

भारतातील आसाम, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल व राजस्थानमधील अजमेर, मारवाड आणि दिल्लीत परीट समाजाचा समावेश अनुसूचित जातीत केला गेलेला आहे. अशा वेळी महाराष्ट्रात वेगळा नियम नको.   आमच्या मागण्यांकडेही मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी परीट समाज संघटनेने केली आहे.