Thu, Jul 18, 2019 21:47होमपेज › Pune › मागणी एका ठिकाणी; पुरवठा दुसरीकडे 

मागणी एका ठिकाणी; पुरवठा दुसरीकडे 

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 12:30AMहडपसर : प्रमोद गिरी

उन्हाळा आला की, पाण्याची जाणिव सर्वांना अधिकच होते. पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशी स्थिती आसतानाही, पुणे मनपाच्या रामटेकडी इंडस्ट्रीयल टँकर पाणी पुरवठा भरणा केंद्र आहे. या पाणी पुरवठा केंद्रावर दररोज टँकरचे पासधारक आणि टेंडरचे मिळुन  सुमारे  तीनशे टँकर दररोज पाणी भरुन दिले जाते. मात्र या केंद्रावरून भरून जाणारे टँकरची मागणी एका ठिकाणी असून हे टँकर दुसर्‍याच ठिकाणी पाणीपुरवठा करत असल्याचे येथील नागरिक सांगतात. माञ  खरोखरच गरज आहे तेथे पाणी पुरवठा झाला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हडपसर उपनगर भागात काही ठिकाणी चढभाग असल्याने पाणी पुरवठा अडखळीत होतो. उदाहणार्थ काळेपडळ, माळवाडी, महमंदवाडी ससाणेनगर मधील अंतर्गत भाग त्याच बरोबर फुरुसुंगी, भेकराईनगर, ढमाळवाडी, ऊरळी देवाची, मुंढवा , केशवनगरपिंगळे वस्ती, मांजरी शेवाळवाडी आदि भागात टँकरने पाणी दिले जाते.

रामटेकडी टँकर भरणा केंद्र सकाळी साडेसात वाजता सुरू होते व सांयकाळी साडे सहावाजता बंद केले जाते. या रामटेकडी भरणा केंद्रावर अधिकृत टँकरचे  पासधारक व ज्यांनी टेंडर भरले त्यांना तपासुनच टँकर भरु दिले जाते असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. माञ येथील व्यवसायिकांना ज्यादा रक्कम घेऊन पाणी दिले जाते अशी तक्रार नागरिकांनी केली. पालिकेचे सुपरवाईजर लक्ष्मण रायकर यांना विचारले असता ते म्हणाले या टँकर भरणा केंद्रावर हडपसर परिसरात सुमारे 100 टँकर लागतात. फुरुसुंगी, ऊरळी देवाची शेवाळेवाडु मुंढवा, पिंगळेवस्ती, महमंदवाडी मांजरी आदी भागात सुमारे दोनशेच्यावर टँकर या ठिकाणाहुन भरुन दिले जाते. 

Tags : Pune, Demand, one, place, hand, supplies