Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Pune › वारज्यात सायकल शेअरिंग योजनेचा बोजवारा

वारज्यात सायकल शेअरिंग योजनेचा बोजवारा

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 12:43AMवारजे : वार्ताहर 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत  सार्वजनिक ठिकाणी महापालिकेतर्फे राबविण्यात आलेली सायकल शेअरिंग सुविधा वारजे प्रभागात सुरू करण्यात आली होती. या योजनेतील सायकलींची दुरवस्था झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. 

वारजे माळवाडी कर्वेनगर प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी सोसायटी परिसरासह लगतच्या भागात शेअरिंग सायकल योजनेतील काही सायकली उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सायकल शेअरिंग योजने अंतर्गत एका सायकली साठी साधारण 30 मिनिटांना 1 रुपया भाडे असा दर निश्चित करण्यात आल्याने अनेक उत्साही नागरिक तरुण या सायकली नियमानुसार वापरताना अनेक ठिकाणी दिसत असताना काही तरुणांकडून या सायकलींचा गैर वापर होत असल्याचे दिसत आहे. 

नागरिकांनी सायकल एका स्थानकावरून घेऊन काम झाल्यानंतर सायकल जवळच्या स्थानकावर लावणे गरजेचे असताना सायकल कुठे ही सोडल्याने काही तरुणांकडून सायकलींच्या अयोग्य वापरासह सायकलींवर नियमबाह्य पद्धतीने तिन व्यक्ती बसविणे, ओबडधोबड तर्हेने सायकलचा वापर करण्यात आल्याचे काही जाणकार नागरिकांकडून सांगण्यात आले तर .  रामनगर डोंगर परिसरातील तरूणांकडून सायकलींचा अयोग्य वापर करत सायकलींचे नुकसान केले असल्याचे ही सांगण्यात आले आहे. 

काही तरुणांणी सायकल पेटीएमच्या माध्यमातून पैसे देऊ करत सायकल वापरासाठी घेण्यात आल्या होत्या त्या सायकलींचा वापर झाल्यानंतर योग्य त्या ठिकाणी पोहोच न केल्याने तसेच प्रशासनाकडून त्या सायकली ताब्यात न घेतल्या गेल्याने त्या सायकलींचा नियमबाह्य वापर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही ठिकाणी या सायकली गल्लोगल्ली पडून असून काही सायकली लहान मुले वापरत असल्याचे दिसत आहे. तसेच काही  सायकलींचे जीपीआरएस, पेटीएम लॉक व इतर पार्ट काढून इतरत्र कुठेही फेकून दिले असल्याने सायकलींची मोठी दुरवस्था झाली असल्याचे नागरीकांकडून सांगण्यात येत आहे.

एकूणच शहरासह उपनगरातील  वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने राबविण्यात आलेल्या या सायकल योजनेचे धोरण काही तरुणांनी पायदळी तुडवील्याने उत्साही नागरिकांकडुन नाराजी व्यक्त केली जात आहे.