Fri, Jan 18, 2019 00:38होमपेज › Pune › राजकीय नेत्यांची बदनामी करणार्‍यावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेसबुक पेज, राजकीय नेत्यांची केली बदनामी

Published On: Dec 24 2017 10:06AM | Last Updated: Dec 24 2017 10:37AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेसबुक पेज वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो आणि व्यंग्यचित्रे तयार करून त्यांच्या नावासह अक्षेपार्ह मेसेजेस सोशल मीडियावर पसरवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मनाली प्रमोद भिलारे (वय 26) यांनी तक्रार दिली आहे.

फिर्यादी या पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत. त्या पक्षात सोशल मीडिया प्रमुख म्हणून काम पाहतात. दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी त्या मोबाईवर फेसबुक खाते पाहत असताना देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या फोटो, तसेच नावाचा वापर करून आक्षेपार्ह मेसेजेस, तसेच व्यंग्यचित्रे तयार करून प्रसारित केल्याचे दिसून आले. पेजवरून महिलांविषयी आक्षेपार्ह कमेंट्स आणि मजकूर लिहिलेला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे फिर्यादीत नमूद केले. खडक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के व तपास करीत आहे.