पुणे : औंध-रावेत उड्डाणपुलाचे लोकार्पण

Last Updated: May 29 2020 1:48PM
Responsive image
औंध-रावेत उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार


पुणे : पुढारी वृत्तसेवा 

औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उड्डाणपुलापैकी औंध-रावेत या उड्डाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून साई चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्यमहाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस

या उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.