Tue, Apr 23, 2019 10:18होमपेज › Pune › मिलिंद एकबोटेंच्या जामिनावर उद्या निर्णय

मिलिंद एकबोटेंच्या जामिनावर उद्या निर्णय

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी 

कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनी झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (61, रा. शिवाजीनगर) यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि.19 एप्रिल) अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या न्यायालयात जामिनावर निर्णय होणार आहे. मंगळवारी (दि. 17) सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्‍तिवाद पूर्ण झाला.  

1 जानेवारी 2018 रोजी शौर्य दिनानिमित्त वंदन करण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारो आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथे आले होते. त्यावेळी कोरेगाव-भीमा गावच्या हद्दीत उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक, जाळपोळीची घटना झाली. यामध्ये 92 दुचाकी, 92 चारचाकी वाहने, चार रिक्षा, 14 टॅम्पो, दुकाने, हॉटेल्स सरकारी, खासगी वाहनांची तोडफोड झाली होती. त्यामध्ये सर्व मिळून सुमारे 5 कोटी 94 लाखांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अ‍ॅट्रॉसिटी कलमानुसर शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात एकबोटे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

त्या प्रकरणात त्यांना जामिनही मिळाला आहे.  शिक्रापूर पोलिस ठाण्यात खुनाचा, प्रयत्न, तोडफोड प्रकरणात त्यांना पुन्हा अटक केली आहे. यामध्ये एकबोटे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. एस.के.जैन आणि अ‍ॅड. अमोल डांगे यांनी त्यांच्या जामिसाठी अर्ज केला आहे. यावर सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार तर साक्षीदाराच्या वतीने अ‍ॅड. तौसिफ शेख, अ‍ॅड. कुमार कलेल हे काम पाहत आहे.

Tags : Pune, Decision, bail,  Milind Ekbote