Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Pune › डेक्कनला होणार मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब

डेक्कनला होणार मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावर डेक्कन जिमखना येथे महामेट्रोकडून   मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. त्यात नदीपात्रालगत मेट्रो स्टेशन असणार असून या स्टेशनलाच पीएमपी बसस्थानक, पार्किंग सुविधांसह अन्य सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी या पीएमपी बसस्थानकाच्या 2 हजार 800 चौरस मीटर जागेची मागणी महामेट्रोकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे काम सुरू असून हे दोन्ही मार्ग शिवाजीनगर धान्य गोदामाच्या ठिकाणी  एकत्रित येतात. त्यामुळे या ठिकाणी मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब तसेच मेट्रो एक्सचेंज स्टेशन उभारण्यात येणार आहेत.  त्याचबरोबर वनाज ते शिवाजीनगर या मार्गावर डेक्कन जिमखाना येथे नदीपात्रालगत मेट्रोचे  स्टेशन असणार आहे. 

मात्र, या ठिकाणापासून अगदी जवळच पीएमपीचे डेक्कन बसस्थानक आहे. डेक्कन परिसर हा शहरातील एक व्यावसायिक मध्यवर्ती केंद्रस्थानी ठिकाण आहे. शहराच्या विविध भागातून येणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागीतल खासगी जागा आणि महापालिकेची जागा घेऊन या ठिकाणी मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले आहे. त्यात मेट्रो स्टेशन, पीएमपी स्थानक, रिक्षास्थानक तसेच पार्किंग आणि इतर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

त्यासाठी पीएमपीच्या 2 हजार 800 चौरस फूट जागेबरोबरच येथील खासगी जागेची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी ही जागा तातडीने हस्तांतरित करण्याची मागणीही महामेट्रोकडून आयुक्त कुणाल कुमार यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

फर्ग्युसन रस्त्यापर्यंत स्कायवॉक

डेक्कनच्या मल्टिट्रान्सपोर्ट हबला जोडण्यासाठी फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौक ते डेक्कन मेट्रो स्टेशन स्कायवॉकही उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर नदीपलीकडील नारायणपेठ एक स्कायवॉक या मेट्रो स्टेशनला जोडला जाणार आहे. नदीपलीकडील वाहनांच्या पाकिर्र्ंगसाठी नदीपात्राजवळली नाना उद्यान आणि वर्तक उद्यानाजवळील  धोबीघाट या दोन्ही जागांची मागणी महामेट्रोकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे.  त्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.