Wed, Nov 14, 2018 08:01होमपेज › Pune › ‘डेक्कन क्वीन’चं रूपडं लवकरच बदलणार

‘डेक्कन क्वीन’चं रूपडं लवकरच बदलणार

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी 

डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या डब्यातील रचना व सजावट यात हमसफर एक्स्प्रेसच्या धर्तीवर अंतर्बाह्य बदल केले जाणार आहेत. हमसफर एक्स्प्रेसप्रमाणेच बाहेरून आकर्षक रंग दिला जाईल. शिवाय जीपीएस यंत्रणा, एलईडी, अग्निरोधक यंत्रणा, मोफत वायफाय या सुविधा व आकर्षक आसनव्यवस्था डब्यात असेल. प्रसाधनगृहांच्या रचनेतही आमूलाग्र बदल केला जाईल, असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. 

उत्कर्ष प्रकल्पांतर्गत डेक्कन क्वीनसह मडगाव डबल डेकर एक्स्प्रेस, मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर एक्स्प्रेस, नागपूर दुरांतो आणि प्रगती एक्स्प्रेस सहा गाड्यांचे उन्नतीकरण केले जाईल. त्यासाठी प्रत्येक ट्रेनला 60 लाख रुपये अतिरिक्त खर्च लागेल. या ट्रेनमध्ये कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी जीपीएस आधारित बायोमेट्रिक यंत्रणा वापरली जाणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत डेक्कन क्वीनचे रूपडे पालटण्याचे नियोजन आहे. शिवाय दिवाळीपर्यंत डबल डेकरची भेट मिळू शकते. सुरुवातीला ब्लू बर्ड बेबी या नावाने ओळखण्यात येणार्या  डेक्कन क्वीनच्या इंजिनाच्या पुढे ब्लू बर्डची प्रतिकृती बसविण्यात येणार असल्याचेही समजते.